धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेता गोविंद नामदेव आणि तरुण अभिनेत्रीच्या प्रेमसंबंधांचा खुलासा!

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेता गोविंद नामदेव आणि तरुण अभिनेत्रीच्या प्रेमसंबंधांचा खुलासा!

प्रसिद्ध अभिनेते गोविंद नामदेव यांच्या चर्चेला उधाण आलं आहे. ‘सत्या’, ‘बँडिट क्वीन’, ‘सिंघम’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या दमदार भूमिका प्रेक्षकांच्या मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. मात्र आता ते वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत.

सोशल मीडियावर गोविंद नामदेव (७० वर्षे) आणि शिवांगी वर्मा (३१ वर्षे) यांच्यातील प्रेमसंबंधांची चर्चा रंगली होती. शिवांगीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर गोविंद नामदेव यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत “प्रेमाला वयाची किंवा मर्यादांची सीमा नसते” असं कॅप्शन दिलं होतं. या फोटोला तब्बल ७०,००० लाईक्स मिळाले होते.

मात्र आता गोविंद नामदेव यांनी या अफवांवर पूर्णविराम दिला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की हा फोटो त्यांच्या आगामी चित्रपट ‘गौरीशंकर गोहरगंज वाले’ च्या कथेशी संबंधित आहे. या चित्रपटात एक वृद्ध व्यक्ती तरुण अभिनेत्रीच्या प्रेमात पडतो अशी कथा आहे.

गोविंद यांनी त्यांच्या पत्नी सुधा नामदेव यांच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करताना म्हटलं, “माझी सुधा माझा श्वास आहे. जगातील कोणतीही गोष्ट, स्वर्ग सुद्धा, माझ्या सुधेसमोर फिकी आहे. जर काही चूक झाली तर मी प्रभूशीही लढेन.”

शिवांगी वर्मा यांनी पुणे मिररशी दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की त्यांची वास्तविक व्यक्तिमत्त्व आणि चित्रपटातील त्यांची भूमिका यात खूप फरक आहे. या भूमिकेसाठी त्यांनी दिग्दर्शक आणि लेखकांसोबत बराच वेळ घालवून मानसिक तयारी केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत